नेब्युला (Nebula)



From Khagol







From Khagol



Nebula -  नेब्युला असे उच्चारण आहे या शब्दाचे. मराठीत नेब्युलाला प्रतिशब्द मला वाटते अभ्रिका आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर नेब्युला म्हणजे ढगच.
नेब्युला मध्ये प्रचंड प्रमाणात धूळ आणि हिलियम वायू असतो. इतरही अनेक वायू असतात. पण मुख्यत्वेकरुन हिलियमवर होणार्‍या प्रक्रियेमुळे नवीन तारे जन्माला येतात.
नेब्युला हे आकाशगंगेचे प्राथमिक स्वरुप म्हटले तरी चालू शकेल. अभ्रिकेमध्ये नित्यनवीन तारे जन्माला येत असतात. तारे निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली की तिला आकाशगंगेचे स्वरुप येत असावे.
असावेच असे म्हणावे लागेल कारण ही प्रक्रिया कित्येक कोटी वर्षे चालते. आणि आपले खगोलशास्त्र त्यामानाने एवढे अनुभवी नाहिये. अगदी पुरातनकाळचे निष्कर्ष आपण घेतले तरी आपली अवकाशविज्ञानातील प्रगती काही हजार वर्षांपलिकडे नक्कीच जात नाही. या तुलनेत कित्येक कोटी वर्षे हा कालावधी केवढा आहे हे सांगण्याची गरज नाही हास्य
तर नित्यनव्याने तारे जन्मास घालणारे ढग म्हणजे अभ्रिका अथवा नेब्युला असे म्हणता येईल.
सध्याच्या ज्ञात खगोलविश्वात क्रॅब नेब्युला (क्रॅब अभ्रिका) ही यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
विकीवर इथे नेब्युलाबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.

Comments

नेब्युलाला ‘तेजोमेघ’ही म्हणतात मराठीत.
होय संकेत बरोबर आहे. तेजोमेघ हा अभ्रिकेपेक्षा जास्त परिचयाचा शब्द आहे असे म्हणता येईल

Popular Posts