Sunday, October 24, 2010

श्वेत बटू (White Dwarf)

श्वेत बटू ही सूर्यासारख्या आकाराने लहान असणार्‍या तार्‍यांची शेवटची अवस्था असते. तार्‍यामधील हायड्रोजनचे हेलियममध्ये अणू-संमेलन झाल्यानंतर हेलियम मध्ये अणू-संमेलनाची क्रिया सुरू होते. जेव्हा सर्व हेलियमचे अणू संपतात तेव्हा तारा आकुंचन पावून श्वेत बटू मध्ये रुपांतरित होतो. याची घनता अतीशय जास्त असते


श्वेत बटू ला इंग्रजीत व्हाईट ड्वार्फ असे संबोधिले जाते. श्वेतबटूंमध्ये घनता प्रचंड असते. श्वेतबटूचे एक सुंदर आणि अप्रतिम उदाहरण आपल्या अगदी जवळच आहे. व्याधाचा तारा पृथ्वीपासून अवघा ८.६ प्रकाशवर्षे अंतरावर आहे, पण गंमत अशी की हा तारा एक तारा नाहिये तर दोन तार्‍यांची जोडगोळी आहे. व्याधाला इंग्रजीत सिरियस (Serius) म्हणतात. यातील मोठ्या तार्‍याला सिरियस-अ (Serius-A) आणि श्वेतबटूला सिरियस - ब (Serius-B) असे म्हणतात  हे दोन्ही तारे एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालतात. आफ्रिकेत एक आदिवासी जमात आहे जी दर ५० वर्षांनी एक उत्सव साजरा करते. व्याधाचा तारा त्यांना अतिशय पूज्य आहे. तुम्हाला माहिती आहे का व्याधाचे २ तारे एकमेकांभोवती १ प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी नेमकी ५० वर्षेच घेतात. आहे की नाही गम्मत? हास्य या दोन तार्‍यांपैकी एक आहे अवाढव्य आणि एक तारा आहे लहानसा. नुसत्या डोळ्यांना व्याधाचा तारा जरी एक दिसत असला तरी हा छोटासा श्वेत बटू प्रचंड घनता बाळगून आहे, त्यामुळे हा छोटा बाळ मोठ्या बापाला फिरवतोय अशी ही गम्मत आहे.


व्याधाचा तारा असा दिसतो
From Khagolश्वेतबटूंमध्ये अजून एक अवस्था येते. जर जोड तार्‍यांपैकी घनता जास्त असणारा तारा मोठ्या तार्‍यातील द्रव्य आपल्याकडे खेचू लागला तर त्या दोघांत एक दुवा तयार होतो. तेव्हा या तार्‍यांना पोलर तारे म्हणून पण संबोधले जाते. पुढील छायाचित्रांवरुन याची कल्पना यावी 
From KhagolFrom Khagol

Saturday, October 23, 2010

राक्षसी तारे : तोंडओळख

राक्षसी तारे : तोंडओळख
राक्षसी तारे हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे. 
काही राक्षसी तारे:From Khagol

वरील यादीत असलेल्या बेटेल्गेयुझ (Betelgeuze) या तार्‍याचे लोकेशन माहिती नसेल तर सांगतो
आकाशात मृग नक्षत्र माहिती असेलच. नसेल तर किमान व्याधाचा तारा तरी माहिती असेल.
या बेटेलग्यूज तार्‍याला मराठीत काक्षी म्हणून ओळखले जाते.
तर मृग नक्षत्रात दिसणारा सर्वात तांबूस रंगाचा तारा म्हणजेच हा बेटेलग्यूज (काक्षी)
या दुव्यावर अधिक माहिती मिळेल
वाचकांनी जर लक्ष दिले तर मुख्यत्वेकरुन सर्व मोठ्या आकाराचे तारे हे तांबड्या रंगाचे आहे हे लक्षात येते.
तर आकारमानाने मोठे तारे दिसतात हे सर्व इंग्रजीत RED GIANT STARS (लाल राक्षसी तारे) म्हणून ओळखले जातात.
तारे लाल आणि राक्षसी का होतात? हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे. मला राक्षसी तारे ही लेखमाला कित्येक वर्षांपासून लिहायची आहे. पण अभ्यासास वेळ नसल्यामुळे तूर्तास थोडक्यात सांगतो.
तारे म्हणजे एक प्रकारची उर्जा निर्माण करणारी भट्टीच असते. प्रचंड प्रमाणावर हेलियम व हायड्रोजन यांच्या नियमित आणि सततच्या प्रक्रियेतून तार्‍याचे प्रज्वलन चालू असते. जोपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत चालू असते तोपर्यंत तार्‍याचे सर्व अवयव एकत्र घट्टपणे दाबून ठेवले जातात. म्हणजेच दुसर्‍या शब्दांत असे म्हणता येईल की तार्‍यांतील इंधन मुबलक प्रमाणात असते.
ज्यावेळी तार्‍यामधील हे इंधन संपू लागते तेव्हा त्या तार्‍याचे स्वतःवरचे नियंत्रण सुटत जाते व परिणामी तो अवाढव्यपणे फुगत जातो. थोडक्यात हे तारे राक्षसी आकाराचे होतात. याच राक्षसी तार्‍यांचे रुपांतर पुढे महाकाय स्फोटात, म्हणजेच सुपरनोव्हात होते.

‘आदित्य’ ह्या नावाचा तारा ज्ञात खगोलविश्वात सर्वात मोठ्या आकाराचा आहे. आदित्य हा तारा आपल्यापासून १०९ प्रकाशवर्षे अंतरावर आहे आणि सूर्यापेक्षा २०,००० पटींनी मोठा आहे
दक्षिण आकाशात क्षितिजाच्या वर साधारण ३० ते ५० अंश वर दिसतो हा तारा. हा तारा आपल्यापासून हजारो प्रकाशवर्ष अंतरावर असल्यामुळे आपण कदाचित वाचलो असे म्हणता येईल. कारण हा तारा स्फोट पावणार आहे ( गणिताप्रमाणे याचा स्फोट होण्यास अजून अवकाश आहे, पण प्रत्यक्षात स्फोट झाला आहे की नाही हे सांगता येत नाही. कारण आपण जो प्रकाश पाहतो आहोत तो १०९ वर्षांपूर्वीचा वर्षांपूर्वीचा असतो हास्य)नेब्युला (Nebula)From KhagolFrom KhagolNebula -  नेब्युला असे उच्चारण आहे या शब्दाचे. मराठीत नेब्युलाला प्रतिशब्द मला वाटते अभ्रिका आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर नेब्युला म्हणजे ढगच.
नेब्युला मध्ये प्रचंड प्रमाणात धूळ आणि हिलियम वायू असतो. इतरही अनेक वायू असतात. पण मुख्यत्वेकरुन हिलियमवर होणार्‍या प्रक्रियेमुळे नवीन तारे जन्माला येतात.
नेब्युला हे आकाशगंगेचे प्राथमिक स्वरुप म्हटले तरी चालू शकेल. अभ्रिकेमध्ये नित्यनवीन तारे जन्माला येत असतात. तारे निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली की तिला आकाशगंगेचे स्वरुप येत असावे.
असावेच असे म्हणावे लागेल कारण ही प्रक्रिया कित्येक कोटी वर्षे चालते. आणि आपले खगोलशास्त्र त्यामानाने एवढे अनुभवी नाहिये. अगदी पुरातनकाळचे निष्कर्ष आपण घेतले तरी आपली अवकाशविज्ञानातील प्रगती काही हजार वर्षांपलिकडे नक्कीच जात नाही. या तुलनेत कित्येक कोटी वर्षे हा कालावधी केवढा आहे हे सांगण्याची गरज नाही हास्य
तर नित्यनव्याने तारे जन्मास घालणारे ढग म्हणजे अभ्रिका अथवा नेब्युला असे म्हणता येईल.
सध्याच्या ज्ञात खगोलविश्वात क्रॅब नेब्युला (क्रॅब अभ्रिका) ही यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
विकीवर इथे नेब्युलाबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.