Tuesday, January 12, 2010

२७ नक्षत्रे : मराठी, ग्रीक आणि इंग्रजी नावे

मराठी मातीने अनेक नामवंत शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आपल्या भारत देशाला दिले हे खरे आहे. पण खगोलशास्त्राचा विस्तृत अभ्यास हा इंग्रजी भाषेत जेवढा झाला आहे तेवढा दुर्दैवाने मराठी भाषेत झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. आजच्या पिढीला बारा राशींची नावे इंग्रजीतूनच माहीत असतील आणि मराठीतून १२ राशींची नावे सांगणे कदाचित अवघडही जाईन. पण या १२ राशींचा आधार जी सत्तावीस नक्षत्रे आहेत त्यांच्या इंग्रजी नावाची आणि मराठी नावाची ओळख करुन देणे हा या लेखाचा हेतू आहे. मधे एकदा मी एका संकेतस्थळावर मृग नक्षत्राच्या काक्षी तार्‍याच्या तांबूस रंगाबद्दल लिहिले होते. तर काक्षी ह्या नावाने काही लोकांना तार्‍याची माहिती कळालीच नाही. मी काक्षीला बेटेलग्युज असे म्हणताच ... अरे हा तारा होय?... अशी प्रतिक्रिया मिळाली. अशा प्रसंगानेच मला हा लेख लिहायची प्रेरणा झाली असे म्हणावयास हरकत नाही... पुढे मी २७ नक्षत्रांची मराठी नावे व त्यापुढे ग्रीक व प्रचलित असणारी इंग्रजी नावे देत आहे ...


येथे अजून एक लिहायचे राहिले. एकूण नक्षत्रे ही २७च आहेत, ज्योतिषिय गणितानुसार. पण "अभिजित" हे अठ्ठाविसावे नक्षत्र समजले जाते ते त्याच्या तेजस्वितेमुळे. अभिजित हा अगदी ठळक तारा आहे. आणि सत्ताविस नक्षत्रांबरोबर काही ज्योतिषि याचाही फलितासाठी विचार करतात. म्हणून या यादीत अभिजित पण दिला आहे. असे म्हणतात की अजून काही हजार वर्षांनी अभिजित हा पृथ्वीचा ध्रुवतारा होणार आहे


7 comments:

रोहन चौधरी ... said...

ह्या विषयावर अधिकाधिक वाचायला आवडेल ... पुढील लिखाणाची वाट बघतोय ... :)

रोहन चौधरी ... said...

तुमचा ब्लॉग फ़ॉलो नाही का करता येणार? तसा ऑप्शन ठेवा की... :)

सागर भंडारे said...

रोहन सूचनेबद्दल धन्यवाद... Follow Blog Option Enable केला आहे... जास्तीत जास्त लेखनाचा प्रयत्न आहे ... लवकरच अधिक लेखन देईन ... ,
धन्यवाद

प्रकाश शंकर कुंभार said...

२००७ पासून फ़क्त तीनच लेख
थोडा स्पीड वाढवाल काय ?
आम्हाला खगोलविश्व बद्दल वाचायला आवडेल.

सागर भंडारे said...

प्रकाश प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या वर्षी सातत्य नक्की राहीन यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. http://www.avakashvedh.com/ हे संकेतस्थ़ळ माहिती नसेल तर अवश्य पहा. सुंदर आहे

Akshay said...
This comment has been removed by the author.
Akshay said...
This comment has been removed by the author.