Saturday, October 23, 2010

राक्षसी तारे : तोंडओळख

राक्षसी तारे : तोंडओळख
राक्षसी तारे हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे. 
काही राक्षसी तारे:From Khagol

वरील यादीत असलेल्या बेटेल्गेयुझ (Betelgeuze) या तार्‍याचे लोकेशन माहिती नसेल तर सांगतो
आकाशात मृग नक्षत्र माहिती असेलच. नसेल तर किमान व्याधाचा तारा तरी माहिती असेल.
या बेटेलग्यूज तार्‍याला मराठीत काक्षी म्हणून ओळखले जाते.
तर मृग नक्षत्रात दिसणारा सर्वात तांबूस रंगाचा तारा म्हणजेच हा बेटेलग्यूज (काक्षी)
या दुव्यावर अधिक माहिती मिळेल
वाचकांनी जर लक्ष दिले तर मुख्यत्वेकरुन सर्व मोठ्या आकाराचे तारे हे तांबड्या रंगाचे आहे हे लक्षात येते.
तर आकारमानाने मोठे तारे दिसतात हे सर्व इंग्रजीत RED GIANT STARS (लाल राक्षसी तारे) म्हणून ओळखले जातात.
तारे लाल आणि राक्षसी का होतात? हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे. मला राक्षसी तारे ही लेखमाला कित्येक वर्षांपासून लिहायची आहे. पण अभ्यासास वेळ नसल्यामुळे तूर्तास थोडक्यात सांगतो.
तारे म्हणजे एक प्रकारची उर्जा निर्माण करणारी भट्टीच असते. प्रचंड प्रमाणावर हेलियम व हायड्रोजन यांच्या नियमित आणि सततच्या प्रक्रियेतून तार्‍याचे प्रज्वलन चालू असते. जोपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत चालू असते तोपर्यंत तार्‍याचे सर्व अवयव एकत्र घट्टपणे दाबून ठेवले जातात. म्हणजेच दुसर्‍या शब्दांत असे म्हणता येईल की तार्‍यांतील इंधन मुबलक प्रमाणात असते.
ज्यावेळी तार्‍यामधील हे इंधन संपू लागते तेव्हा त्या तार्‍याचे स्वतःवरचे नियंत्रण सुटत जाते व परिणामी तो अवाढव्यपणे फुगत जातो. थोडक्यात हे तारे राक्षसी आकाराचे होतात. याच राक्षसी तार्‍यांचे रुपांतर पुढे महाकाय स्फोटात, म्हणजेच सुपरनोव्हात होते.

‘आदित्य’ ह्या नावाचा तारा ज्ञात खगोलविश्वात सर्वात मोठ्या आकाराचा आहे. आदित्य हा तारा आपल्यापासून १०९ प्रकाशवर्षे अंतरावर आहे आणि सूर्यापेक्षा २०,००० पटींनी मोठा आहे
दक्षिण आकाशात क्षितिजाच्या वर साधारण ३० ते ५० अंश वर दिसतो हा तारा. हा तारा आपल्यापासून हजारो प्रकाशवर्ष अंतरावर असल्यामुळे आपण कदाचित वाचलो असे म्हणता येईल. कारण हा तारा स्फोट पावणार आहे ( गणिताप्रमाणे याचा स्फोट होण्यास अजून अवकाश आहे, पण प्रत्यक्षात स्फोट झाला आहे की नाही हे सांगता येत नाही. कारण आपण जो प्रकाश पाहतो आहोत तो १०९ वर्षांपूर्वीचा वर्षांपूर्वीचा असतो हास्य)No comments: