Monday, July 9, 2007

खगोलीय अंतरे मोजण्याची एकके


१ प्रकाशवर्ष = ९४६०८०००००००० कि.मी. (म्हणजे प्रकाशाने १ वर्षात कापलेले अंतर)



खगोलशास्त्रात दोन तार्‍यांमधील वा दोन ग्रहांमधील अंतर मोजण्यासाठी आपली पृथ्वीवरची परिमाणे फारच थिटी पडतात.
उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्या पृथ्वीपासून सूर्याचे सरासरी अंतर आहे - १४९५९७८०० किलोमीटर. आता बोला, किलोमीटर या एककात पृथ्वी ते सूर्य हे अंतर नक्की किती आहे हे आपल्याला समजून घेता येत नाही तर दोन तार्‍यांमधील अंतर कसे मोजता येईल?


ही अडचण ओळखून खगोलीय अंतराच्या मापनासाठी खगोलशास्त्रज्ञांनी "ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट" (खगोलीय एकक वा ज्योतिषीय एकक ) आणि "लाईट इयर" ("प्रकाशवर्ष") या संकल्पना अस्तित्वात आणल्या
१ ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट = १४९५९७८००.६९१ कि.मी. (पृथ्वी ते सूर्य यांतील सरासरी अंतर )हे एकक मुख्यतः सूर्यापासून ग्रहाचे अंतर मोजण्यासाठी वापरतात.



हे एकक मुख्यतः तार्‍यांमधील अंतर मोजण्यासाठी वापरतात. (अर्थातच यासाठी बेस हा पृथ्वी आहे)


पृथ्वीपासूनच्या काही महत्त्वाच्या तार्‍यांची अंतरे:


तूर्तास एवढे पुरे. लवकरच नवीन माहीती दुसर्‍या लेखाद्वारे देईन


धन्यवाद,
सागर

7 comments:

Sonal said...

तुमचे ब्लॉग्स पाहिले. एकाहून एक सरस आहेत. सागरतरंग आणि जुने ते सोने विशेष! :-) खगोलविश्वाच्या पुढच्या पोस्ट्ची वाट पाहते आहे. तन्मयला नक्की कामाला येईन. कुठले व्हिडिओज मिळाले तर ते ही द्याल ना खगोलविश्वावर. माहिती अजून थोडी रंजक होईल.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर said...

Good. Next post awaited.

सागर भंडारे said...

सोनल, लेखनात सातत्य ठेवण्याचा व खगोलविश्व वर जास्तीत जास्त लेखन करण्याचा नवीन वर्षाचा संकल्प आहे...
बघू कसे जमते ते.. :)
उशिराच्या प्रतिसादाबद्दल क्षमस्व
धन्यवाद...

संकेत आपटे said...
This comment has been removed by the author.
संकेत आपटे said...

तुमचा ब्लॉग छान आहे. पण फक्त पाचच पोस्ट्स? आणि त्याही अडीच वर्षांत? लिहिण्याची वारंवारता (Frequency) वाढवा की राव. मराठीत तसंही ललित साहित्य जास्त आहे ब्लॉग्जमध्ये. शास्त्रीय माहिती देणारे ब्लॉग्ज विरळच आहेत. आवडेल मला तुमचा ब्लॉग वाचायला.

सागर भंडारे said...

संकेत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या वर्षी सातत्य नक्की राहीन यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जुन्या कंपनीमध्ये कामाचा ताण प्रचंड असायचा त्यामुळे लेखन व अभ्यास यावर बृयाच मर्यादा होत्या. अलिकडेच कंपनी बदलली आहे तेव्हा मी नक्की सातत्याने लेखन करेन. http://www.avakashvedh.com/ हे संकेतस्थ़ळ माहिती नसेल तर अवश्य पहा. सुंदर आहे

Parag Vasekar said...

Sagar,

Very nice blog. Interesting and informative. Hope to see more from you in the coming days.

ऑक्टोबर २०२१ महिन्याचे आकाश दर्शन : शुक्र व ज्येष्ठेची दुर्मिळ युती ...

ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे खगोल दर्शन  सौजन्य : दैनिक सकाळ (०१ ऑक्टोबर २०२१) मार्गदर्शक : डॉ. प्रकाश तुपे सर.