वॉशिंग्टन - गुरुत्वाकर्षण शक्ती नगण्य असलेल्या ठिकाणी आग कशी पसरेल, हे जाणून घेण्यासाठी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था (नासा) अवकाशात एक प्रयोग करणार आहे. नासामधील "जॉन एच ग्लेन‘ संशोधन केंद्राकडून हा प्रयोग केला जाणार असून, त्याअंतर्गत अवकाशात मोठ्या प्रमाणात आग लावण्यात येणार आहे.
"स्पेसक्राफ्ट फायर एक्सपेरिमेंट‘ (सफायर) असे या प्रयोगाचे नामकरण करण्यात आले आहे. अवकाशामधील आगीच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी हा प्रयोग येत्या 22 तारखेस केला जाईल. या प्रयोगासाठी नासा व नासाची व्यावसायिक भागीदार कंपनी "ऑर्बिटर एटीके‘ एकत्रितरीत्या "सायग्नस‘ हे अवकाशयान अवकाशात पाठविणार आहे.
वर्तमान व भविष्यकाळातील अवकाश मोहिमांसाठी हा प्रयोग आवश्यक असल्याचे या प्रयोगाशी संबंधित असलेले अभियंते गॅरी रफ यांनी सांगितले.
1 comment:
खुपच छान माहिती !
Post a Comment