Sunday, October 24, 2010

श्वेत बटू (White Dwarf)

श्वेत बटू ही सूर्यासारख्या आकाराने लहान असणार्‍या तार्‍यांची शेवटची अवस्था असते. तार्‍यामधील हायड्रोजनचे हेलियममध्ये अणू-संमेलन झाल्यानंतर हेलियम मध्ये अणू-संमेलनाची क्रिया सुरू होते. जेव्हा सर्व हेलियमचे अणू संपतात तेव्हा तारा आकुंचन पावून श्वेत बटू मध्ये रुपांतरित होतो. याची घनता अतीशय जास्त असते


श्वेत बटू ला इंग्रजीत व्हाईट ड्वार्फ असे संबोधिले जाते. श्वेतबटूंमध्ये घनता प्रचंड असते. श्वेतबटूचे एक सुंदर आणि अप्रतिम उदाहरण आपल्या अगदी जवळच आहे. व्याधाचा तारा पृथ्वीपासून अवघा ८.६ प्रकाशवर्षे अंतरावर आहे, पण गंमत अशी की हा तारा एक तारा नाहिये तर दोन तार्‍यांची जोडगोळी आहे. व्याधाला इंग्रजीत सिरियस (Serius) म्हणतात. यातील मोठ्या तार्‍याला सिरियस-अ (Serius-A) आणि श्वेतबटूला सिरियस - ब (Serius-B) असे म्हणतात  हे दोन्ही तारे एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालतात. आफ्रिकेत एक आदिवासी जमात आहे जी दर ५० वर्षांनी एक उत्सव साजरा करते. व्याधाचा तारा त्यांना अतिशय पूज्य आहे. तुम्हाला माहिती आहे का व्याधाचे २ तारे एकमेकांभोवती १ प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी नेमकी ५० वर्षेच घेतात. आहे की नाही गम्मत? हास्य या दोन तार्‍यांपैकी एक आहे अवाढव्य आणि एक तारा आहे लहानसा. नुसत्या डोळ्यांना व्याधाचा तारा जरी एक दिसत असला तरी हा छोटासा श्वेत बटू प्रचंड घनता बाळगून आहे, त्यामुळे हा छोटा बाळ मोठ्या बापाला फिरवतोय अशी ही गम्मत आहे.


व्याधाचा तारा असा दिसतो




From Khagol



श्वेतबटूंमध्ये अजून एक अवस्था येते. जर जोड तार्‍यांपैकी घनता जास्त असणारा तारा मोठ्या तार्‍यातील द्रव्य आपल्याकडे खेचू लागला तर त्या दोघांत एक दुवा तयार होतो. तेव्हा या तार्‍यांना पोलर तारे म्हणून पण संबोधले जाते. पुढील छायाचित्रांवरुन याची कल्पना यावी 




From Khagol







From Khagol

2 comments:

संकेत आपटे said...

एका दिवसात दोन पोस्ट्स. क्या बात है! असेच लेख लिहित राहा नित्यनियमाने. :-)

सागर भंडारे said...

हो संकेत एवढ्यात थोडा वेळ मिळाला म्हणुन करु शकलो लेखन. राक्षसी तारे हि लेखमाला लिहायची आहे. लवकरच करेन सुरु

ऑक्टोबर २०२१ महिन्याचे आकाश दर्शन : शुक्र व ज्येष्ठेची दुर्मिळ युती ...

ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे खगोल दर्शन  सौजन्य : दैनिक सकाळ (०१ ऑक्टोबर २०२१) मार्गदर्शक : डॉ. प्रकाश तुपे सर.