Sunday, May 16, 2021

चीनची तियानवेन -१ या अवकाशयानाची बग्गी उतरली मंगळावर

बीजिंग - चीनचे (China) तियानवेन -१ (Tianwen-1) या अवकाशयानाची बग्गी (Spacecraft) शनिवारी १५ मे २०२१ रोजी, मंगळाच्या (Mars) पृष्ठभागावर सुखरूप उतरली. अमेरिकेनंतर मंगळाच्या जमिनीवर यान उतरविणारा चीन हा जगातील दुसरा देश ठरला आहे. यासंबंधी चायना नॅशनल स्पेस ॲडमिनीस्ट्रेशनच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आली. (Chinas Tianwen 1 spacecraft landed on Mars)

चीनच्या पुराणकथेतील अग्नीची देवता ‘झुरॉन्ग’ च्या नावाने या बग्गीचे (रोव्हर) नामकरण करण्यात आले आहे. मंगळावरील युटोपिया इम्पॅक्ट बेसिनमधील एका सपाट मैदानावर हा २४० किलो वजनाची बग्गी उतरली आहे. सहा चाकांचा ही बग्गी पुढील तीन महिने मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे. तियानवेन-१ हे अवकाशयान ऑर्बायटर लॅंडर आणि बग्गीसहीत २३ जुलै २०२० मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. मंगळावर उतरल्यानंतर  तियानवेन -१ यानाच्या झुरॉन्ग बग्गीने पृथ्वीवर टेलिमेट्री सिग्नल पाठवला. यातून युटोपिया प्लेटवर लॅंडर सुखरूप उतरल्याचे सिद्ध झाले. अमेरिकेनंतर अशी मोहीम यशस्वी करणाऱ्या चीनने एक आव्हानात्मक मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या (सीपीसी) केंद्रीय समितीने तियानवेन-१ मोहिमेतील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.


बातमी सौजन्य : www.esakal.com 


ऑक्टोबर २०२१ महिन्याचे आकाश दर्शन : शुक्र व ज्येष्ठेची दुर्मिळ युती ...

ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे खगोल दर्शन  सौजन्य : दैनिक सकाळ (०१ ऑक्टोबर २०२१) मार्गदर्शक : डॉ. प्रकाश तुपे सर.