वॉशिंग्टन - नासाच्या महत्वाकांक्षी मंगळमोहिमदरम्यान मंगळावर दीर्घकाळ राहणाऱ्या मानवाच्या वास्तव्याबाबत नासाने खुले स्पर्धात्मक आवाहन करण्यात आले असून त्यासाठी कल्पना मागविण्यात येत आहेत.
नासा मंगळावर मानवी वस्ती उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. हा प्रकल्प आव्हानात्मक असून अंतराळवीरांना निरनिराळ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या प्रकल्पादरम्यान अंतराळामध्ये वास्तव्य करण्यासाठी आवश्यक त्या बाबींसाठी विविध कल्पना मागविण्यात येत आहेत. त्यामध्ये वास्तव्य, अन्न, पाणी, श्वासोच्छवासासाठी प्राणवायू, संपर्क यंत्रणा, व्यायाम तसेच औषधोपचरांबाबत कल्पना मागविण्यात आल्या आहेत. "यामध्ये सहभागी होणाऱ्यांना या उदाहरणांच्या पलिकडे काही कल्पक आणि नाविन्यपूर्ण घटकांबाबत विचार करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे‘ असे नासाच्या वतीने कळविण्यात आले आहे. विजेत्याला पाच हजार डॉलरचे बक्षिस दिले जाणार आहे. तसेच पुरस्कारांची एकूण रक्कम 15 हजार डॉलर्स आहे. सहभागींना मंगळाच्या पृष्ठभागाच्या क्षमता आणि कार्यपद्धतीचा विचार करून पृथ्वीवरील कमीत कमी मदतीशिवाय मोहिम यशस्वी करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समर्पकता, कल्पकता, साधेपणा, संसाधनांची कार्यक्षमता, व्यवहार्यता, सर्वसमावेशकता या बाबींच्या आधारे यशस्वी सहभागीची निवड करण्यात येणार आहे.
पुढील दुव्यावरुन नासाच्या या उपक्रमाची माहिती मिळेल. तसेच पारितोषिक किती व कसे असेल याचीही माहिती मिळेल. : http://www.nasa.gov/solve/marsbalancechallenge
माहिती स्त्रोतः नासा वेबसाईट व ईसकाळ.कॉम
No comments:
Post a Comment