ऑस्ट्रेलियन धूमकेतू शोधक टेरी लव्हजॉय याने १७ ऑगस्ट २०१४ ची पहाट
होण्यापूर्वी हा धूमकेतू सर्वप्रथम पाहिला.२००७ सालापासून या धूमकेतू
शोधकाने शोधलेला हा पाचवा धूमकेतू. टेरी लव्हजॉय ऑस्ट्रेलियाच्या
क्वीन्सलँड प्रांतातील बर्कडेल येथून आकाश निरिक्षण करत असताना या
धूमकेतूचा शोध लावला.
एका संकेतस्थळाशी दिलेल्या मुलाखतीत टेरी लव्हजॉय ने हा धूमकेतू कसा शोधला ते थोड्या सोप्या शब्दांत सांगितले. हल्ली दूरदर्शीतील तंत्र आधुनिक होत चालले आहे. त्यातील इमेजिंग प्रणालीचा वापर करुन लव्हजॉय ने दर दहा मिनिटांच्या अंतराने तीन फोटो घेतले. थोड्या अंतराने घेतलेले फोटो हे धूमकेतू शोधण्याच्या कामात अतिशय उपयोगी ठरतात. जर एखादा धूमकेतू अथवा उल्का आकाशात असेल तर ती अशा थोड्या थोड्या अंतराने घेतलेल्या फोटोंमधून जागा बदलण्याच्या घटकामुळे लगेच सापडते.
जिज्ञासूंनी हा लव्हजॉय धूमकेतू अवश्य बघावा. सध्या तो मृग नक्षत्रात आहे आणि हळुहळु उत्तरेकडे सरकत जाणार आहे. जानेवारीत बरा दिसेल. छोट्याश्या दुर्बिणीच्या अथवा द्विनेत्रीच्या साहाय्याने बघितल्यास धूमकेतू बघण्याचे नेत्रसुख मिळवता येईल.
लव्हजॉय या धूमकेतूचा १६ जानेवारी २०१४ पर्यंतचा मार्ग: