Sunday, January 15, 2017

पृथ्वीचा एकमेव उपग्रह असलेल्या चंद्राचे वय 4.51 अब्ज वर्षांचे




चंद्राचे वय 4.51 अब्ज वर्षांचे

moon




'झिरकॉन्स'च्या अभ्यासाअंती संशोधकांचा निष्कर्ष
लॉस एंजेल्स : पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या चंद्राचे वयोमान नेहमीच संशोधकांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असते. काही संशोधकांच्या मते चंद्र हा पृथ्वीपेक्षा पुरातन आहे. आता नव्या संशोधनातून पूर्वीच्या अनेक समजुतींना आणि तर्कांना तडा गेला आहे. चंद्राचे वयोमान हे 4.51 अब्ज वर्षे एवढे असावे, असा दावा संशोधकांनी अभ्यासाअंती केला आहे.
'अपोलो-14' या मोहिमेच्या माध्यमातून 1971 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरून झिरकॉन्स नावाचा धातू आणण्यात आला होता. त्याचा अभ्यास करून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. चंद्राचे किमान वयोमान किती असावे, हे आम्हाला अधिक अचूकरीत्या शोधता आले असल्याचे "युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया'मधील भूरसायनशास्त्रज्ञ मेलेनाय बारबोनी यांनी सांगितले. अवकाशातील एखाद्या अवाढव्य वस्तूचा पृथ्वीवर आघात झाल्याने चंद्राची निर्मिती झाली असावी, असाही एक सिद्धांत संशोधकांकडून मांडला जातो.
सौरमालेची निर्मिती झाल्यानंतर तब्बल 60 दशलक्ष वर्षांनंतर चंद्राची निर्मिती झाल्याचेही यातून स्पष्ट होते. यामुळे संशोधकांना पृथ्वी आणि सौरमालेच्या निर्मिती प्रक्रियेवरदेखील नव्याने प्रकाश टाकता येईल. दरम्यान, पृथ्वीची अवकाशातील अज्ञात वस्तूशी धडक होण्यापूर्वी नेमक्‍या कोणत्या प्रक्रिया घडल्या, हे मात्र संशोधकांना समजलेले नाही. ते समजल्यानंतर त्यांना अंतराळातील अनेक घडामोडींचा संदर्भ लावता येणे शक्‍य होईल. चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारच्या खडकांचे तुकडे आढळून येतात. ते तुकडे एकत्र येऊनच चंद्र तयार झाला असावा, असाही दावा काही संशोधक करतात.
जैव इतिहास सांगणारे घड्याळ
मूळ अवस्थेतील झिरकॉन्सच्या आठ नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून, युरेनियम, ल्युटियमच्या एकत्रित चाचण्याही संशोधकांनी घेतल्या. झिरकॉन्स हा नैसर्गिक घड्याळ म्हणून ओळखला जातो. जैव इतिहास सांभाळण्याचे काम हा धातू करतो. तसेच या धातूचे जन्मस्थान शोधणेही तुलनेने अधिक सोपे असते, असे केव्हिन मॅक्केगन यांनी सांगितले. "जर्नल सायन्स ऍडव्हान्सेस'मध्ये हे संशोधन विस्ताराने प्रसिद्ध झाले आहे.


Link to Original Science Journal Paper : Early formation of the Moon 4.51 billion years ago
सौजन्यः नासा आणि सकाळ वृत्तवाहिनी

Tuesday, January 3, 2017

दुर्मिळ धूमकेतू दिसणार



दुर्मिळ धूमकेतू दिसणार




वॉशिंग्टन - "नासा'च्या शास्त्रज्ञांनी शोधलेला एक दुर्मिळ धूमकेतू या आठवड्यात दुर्बिणीच्या साह्याने पाहण्याची संधी नागरिकांना आणि अभ्यासकांना प्रथमच मिळणार आहे. या धूमकेतूची कक्षा हजारो वर्षांची आहे.
सी/2016 यू1 निओवाइज असे या धूमकेतूचे नाव आहे. या धूमकेतूच्या दृश्‍यमानतेबाबत फारसा ठोस अंदाज काढता येत नसला तरी, हा धूमकेतू चांगल्या दुर्बिणीच्या साह्याने दिसण्याची दाट शक्‍यता आहे, असे पॉल चोड्‌स यांनी सांगितले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा धूमकेतू उत्तर ध्रुवावरून दिसणार असून, त्यानंतर तो दक्षिणेकडील भागांना पहाटेच्या वेळेत दिसण्याची शक्‍यता आहे. 14 जानेवारीला तो बुधाच्या कक्षेत शिरेल. हा त्याचा सूर्यापासूनचा सर्वांत नजीकचा बिंदू असेल. यानंतर तो सौरमालेच्या बाहेर जाण्यासाठी मार्गक्रमण करेल. या धूमकेतूपासून पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
"डब्लूएफ9'चाही शोध
"नासा'च्या निओवाइज या प्रकल्पाअंतर्गत सौरमालेच्या आसपासच्या अनेक घटकांचा अभ्यास आणि शोध घेतला जातो. गेल्या वर्षी 27 नोव्हेंबरला "नासा'च्या शास्त्रज्ञांनी 2016डब्लूएफ9 या वस्तूचा शोध लावला. ही वस्तू म्हणजे काय, याचा अद्याप अभ्यास झालेला नाही. 25 फेब्रुवारीच्या आसपास ही वस्तू पृथ्वीच्या कक्षेत येणार आहे.

comet



माहिती स्त्रोतः नासा वेबसाईट व ईसकाळ.कॉम

ऑक्टोबर २०२१ महिन्याचे आकाश दर्शन : शुक्र व ज्येष्ठेची दुर्मिळ युती ...

ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे खगोल दर्शन  सौजन्य : दैनिक सकाळ (०१ ऑक्टोबर २०२१) मार्गदर्शक : डॉ. प्रकाश तुपे सर.